पैठणला बस मोटरसायकलची समोरासमोर धडक, चिमुकलीसह तिघांचा मृत्यू

Foto
पैठण, (प्रतिनिधी): मुलीसाठी नवीन कपडे घेऊन गावाकडे निघालेल्या दोघांसह तीन वर्षीय मुलीचा बसखाली चिरडून मृत्यू जागीच मृत्यू झाल्याची घटना विद्याधन कोचिंग क्लासेस समोर रविवारी घडली आहे.

अपघात होताच एसटी चालक फरार झाला आहे. पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पत्नीसाठी कुंकू खरेदी करून व चिमुकलीसाठी नवीन कपडे खरेदी करून आगर नांदर येथे घरी परतणाऱ्या दुचाकीवरील तिघांचा आणि शेवगावहून पैठणला येणाऱ्या एसटी बसचा समोरासमोर अपघात झाला, 

हा अपघात इतका भीषण होता की यात दुचाकीवरील दोन तरुण आणि तीन वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू, झाल्याची घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. अशोक रमेश भालेराव (३३, रा. अंतरवाली राठी, जि. जालना), कृष्णा अशोक गायकवाड (२५, रा. राक्षी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) आणि ऋतुजा उर्फ छकुली कृष्णा गायकवाड (३) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक भालेराव आणि कृष्णा गायकवाड हे दोघे नात्याने साडू आहेत. दोघेही सोनाई साखर कारखान्याच्या ऊसतोडीसाठी आगर नांदर परिसरात आले होते. रविवारी दुपारी दोघे कृष्णाच्या चिमुकल्या मुलीला घेऊन दुचाकी (एमएच २० जेए २९७९) ने पैठण येथे संत एकनाथ महाराज मंदिरात दर्शनासाठी आले होते. 

दर्शन झाल्यानंतर त्यांनी बाजारातून मुलीसाठी नवीन कपडे खरेदी केल्यानंतर ते घराकडे निघाले. मात्र, संकेत दुकानासमोर एसटी बस (एमएच ०६ बीडब्लु ४३६९) आणि त्यांच्या दद्याकीचा समोरासमोर अपघात झाला. यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात घडताच एसटी बस चालक तानाजी गोरोबा राऊत घटनास्थळावरून
पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत
आहेत.